June 16, 2021

Marathi Live News

Marathi Live News

तब्बल एक महिन्यानंतर पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण…

1 min read

 848 total views,  4 views today

*तब्बल एक महिन्यानंतर पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण*

मुंगसे, ता. अमळनेर दि. ९(वार्ताहर)–पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महिना उलटून गेल्यावरही पातोंडा ग्रामस्थांना कोरोना लसींची प्रतिक्षा बाबतची मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून केली जात होती.
याबाबतआरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत दि. 09 जून रोजी पातोंडा ग्रामस्थांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचे सत्र राबविण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील महिन्याच्या 07 मे रोजी कोरोनाचे लसीकरण सत्र होते, पण त्यानंतर पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचे सत्र न राबविता, आरोग्य प्रशासनाने उपकेंद्र असलेल्या सावखेडा,मठगव्हाण,दहिवद,गडखांब,जळोद,निंभोरा आदी ठिकाणी कोरोना लसीकरण सत्र घेण्यात आले. मात्र लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असलेल्या पातोंडा येथे लसीकरण सत्र आठवड्यातून दोन ते तीन दिवस होणे अपेक्षित होते. वय वर्षे 45 ओलांडलेल्या काही नागरिकांचे पहिला डोस होऊनही खूप दिवस लोटल्याने त्यांना दुसऱ्या लसींची प्रतीक्षा होती. आणि नव्याने प्रथम डोस घेण्यासाठी नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात रोजनिशी आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारपूस करत होते.कोरोना लसीकरण सत्राला महिना उलटूनही आरोग्य प्रशासनाकडून पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सत्र होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.
तात्काळ दखल घेत आरोग्य प्रशासनाने दि. 09 जून रोजी तब्बल 240 लसींचे डोस दाखल झालेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीत संध्याकाळ पर्यंत 216 कोरोना लसी नागरिकांना देण्यात आल्यात. या लसीकरण सत्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पाटील,डॉ.रोशन राजपूत,डॉ.घनश्याम पाटील, डॉ.शिल्पा साळुंखे,आरोग्यसेविका एस.बी.गीते,आरोग्यसेवक संतोष जावरे,परिचर देविदास चावरे,शिपाई श्रीकृष्ण मोरे,रुग्णवाहिकाचालक जितेंद्र पाटील,प्रफुल्ल पवार,अर्जुन लोहार,योगेश देसले आदींनी परिश्रम घेतले. यावेळी सरपंच भरत बिरारी,सामाजिक कार्यकर्ते किशोर मोरे, भानुदास पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright ©www.marathilivenews.in | LM +91 8698593194 | Newsphere by AF themes.