June 16, 2021

Marathi Live News

Marathi Live News

दिव्यांगांना देण्यात येणारे फिनो बँकेचे स्मार्ट कार्ड रद्द करा -प्रहार संघटना

1 min read

 1,068 total views,  2 views today

दिव्यांगांना देण्यात येणारे फिनो बँकेचे स्मार्ट कार्ड रद्द करा -प्रहार संघटना

अमळनेर प्रतिनिधी :
दिव्यांगांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी दिनांक ६ मार्च २०२१ रोजी युनिक (UDID) कार्ड वरून जेष्ठ नागरिकांना देण्यात येणारे स्मार्ट कार्ड सारखे कार्ड दिव्यांगांना देण्यात येणार आहे व त्यांची नोंदणी देखील चालू करण्यात आली आहे असे आदेश काढण्यात आले आहेत परंतु दि.९ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार आधार कार्ड संलग्न स्मार्ट कार्ड देने असा शासन निर्णय असून देखील एस टी महामंडळ यांच्या कडून आदेश काढण्यात आले आहेत.
दिव्यांगांना समाज कल्याण विभाग यांच्याकडून पिवळी वन फोर पास असतांना केंद्र शासनाने दिव्यांगांना युनिक कार्ड सवलतीस ग्राह्य धरावे असे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी काढले आहेत. यावर दिव्यांग व्यक्तींनी अजून किती कार्ड सवलतीसाठी सोबत ठेवावे म्हणून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी ६ मार्च रोजी काढण्यात आलेले आदेश रद्द करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अमळनेर शहराध्यक्ष योगेश पवार यांनी ऑनलाईन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright ©www.marathilivenews.in | LM +91 8698593194 | Newsphere by AF themes.