June 16, 2021

Marathi Live News

Marathi Live News

केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या राज्यस्तरीय मान्यवरांची निवड

1 min read

 1,179 total views,  2 views today

*केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या राज्यस्तरीय मान्यवरांची निवड*

मुक्ताईनगर

केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय मान्यवरांची निवड नुकतीच राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी केली यामध्ये महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवृत्त जिल्हाधिकारी तथा विभागीय महसूल आयुक्त लेखक, विचारवंत श्री बी. जी. वाघ नाशिक, महाराष्ट्र राज्य सल्लागार पदी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ.श्रीकांत श्रीपती पाटील कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य महिला सल्लागारपदी अमरावती येथील सुप्रसिद्ध लेखिका डॉ. शोभाताई रोकडे, अमरावती विभाग प्रमुख म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, प्राचार्य, डॉ.सतीश तराळ, अमरावती, रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून समाजसेवक श्री अशोक शिरसाट, पनवेल, आदी मान्यवरांची नुकतीच निवड राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी केली या मान्यवरांना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंदजी दहिवले यांच्या सहीचे पत्र व आयडेंटी कार्ड नुकतेच त्यांना पोस्टाने प्राप्त झाले त्यांच्या निवडीबद्दल केंद्रीय मानवाधिकार संघटनेला मोठे बळ प्राप्त होईल असेही दहिवले म्हणाले राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंदजी दहिवले राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी अभिनंदन केले आहे.

1 thought on “केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या राज्यस्तरीय मान्यवरांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright ©www.marathilivenews.in | LM +91 8698593194 | Newsphere by AF themes.