June 16, 2021

Marathi Live News

Marathi Live News

संत सावता माळी युवक संघातर्फे व लासुर तालुका चोपडा येथील समाज बांधव यांच्यामार्फत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा सत्कार

1 min read

 688 total views,  2 views today

संत सावता माळी युवक संघातर्फे व लासुर ता चोपडा येथील समाज बांधव यांच्या मार्फत मा. श्री.गुलाबराव वाघ यांचा सत्कार

अवघ्या धरणगाव शहराला लहानां पासून मोठ्यां पर्यंत सर्वांना सुपरिचित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. गुलाब रावजी वाघ. स्वर्गीय माजी आमदार हरिभाऊ आत्माराम महाजन शिवसेना सोडून गेल्यावर शिवसेनेची शहराची धुरा समर्थपणे सांभाळण्याचे काम भाऊंनी अविरत सुरू ठेवले, भाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा मोठा असला तरी आज भाऊंना जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाऊंची ओळख ही निर्माण झालेली आहे.
सर्वसाधारण शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख आणि आता तर मा.श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून भाऊंना लोकसभेचे जळगाव जिल्ह्यातील सहसंपर्क प्रमुख पद चालून आले,यालाच शिवसेनेतील कार्यकर्तृत्वाची व निष्ठेची पावती म्हणावी लागेल. भाऊंनी केलेल्या आतापर्यंतच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा व दखल मातोश्री मध्ये घेतली जाते याचाच अर्थ असा की पुढील आगामी काळात यापेक्षा मोठी जबाबदारी गुलाबराव जी वाघ यांच्यावर येऊ शकते असे कार्यकर्त्यांचे व शिवप्रेमींचे म्हणणे आहे.
यानिमित्त लासूर येथून संत सावता माळी युवक संघातर्फे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते त्यात लासुर ता. चोपडा येथील माळी समाज बांधव किशोर माळी सर, हिम्मत माळी सर, कैलास महाजन, विक्रम माळी, कैलास महाजन सर, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव महाजन, सुरेश माळी, श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन,तालुका अध्यक्ष निलेश महाजन,शहर अध्यक्ष योगेश महाजन आदींनी सत्कार करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright ©www.marathilivenews.in | LM +91 8698593194 | Newsphere by AF themes.