June 16, 2021

Marathi Live News

Marathi Live News

लासुर तालुका चोपडा येथील माळी समाज बांधव व संत सावता माळी युवक संघाच्या वतीने एडवोकेट संजय महाजन यांचा सत्कार

1 min read

 523 total views,  4 views today

लासुर ता चोपडा येथील माळी समाज बांधव व श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने अँड.संजय महाजन यांच्या सत्कार

धरणगाव शहरात भाजपा पक्षाचे नाव घेतले तर सर्वप्रथम आपणास आज मितीस मा. ॲडव्होकेट संजय भाऊ महाजन हे प्रकर्षाने नाव डोळ्यासमोर येते, कारण संजय भाऊंनी पक्षासाठी विविध आंदोलने त्याच प्रमाणे सामाजिक कार्य,अडणाऱ्या- नडणार यांचे लहान सहान कार्य तेसुद्धा स्वतःचे समजून करून घेत यामुळे संजय भाऊ महाजन यांची धरणगाव शहरात एक वेगळीच प्रतिमा व प्रतिभा निर्माण झालेली आहे. ॲड.संजय भाऊ महाजन कॉलेज जीवनापासूनच डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळखले जायचे आणि आता तर कोरोना च्या महामारीत संजय भाऊंचे कार्य हे शहरातील जनतेने अगदी जवळून पाहिले आहे.मध्यंतरी स्वतः पॉझिटिव्ह झाल्याने कार्य थोडसे मंदावते की काय असे वाटत होते परंतु भाऊंची कार्यकर्त्यांची फळी पाहता कार्य हे अविरतपणे सुरू होते.
याची पावती की दुग्धशर्करा योग संजय भाऊंना ओबीसी जिल्हाध्यक्ष पद चालून आले त्यानिमित्त संत सावता माळी युवक संघातर्फे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित शासनाचे सर्व नियम पाळून छोटेखानी सत्कार आयोजित केलेला होता.
त्याप्रसंगी लासुर ता. चोपडा येथील माळी समाज बांधव किशोर माळी सर, हिम्मत माळी सर, कैलास महाजन, विक्रम माळी, कैलास महाजन सर, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव महाजन, सुरेश माळी, श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन,तालुका अध्यक्ष निलेश महाजन,शहर अध्यक्ष योगेश महाजन आदींनी सत्कार करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright ©www.marathilivenews.in | LM +91 8698593194 | Newsphere by AF themes.