June 16, 2021

Marathi Live News

Marathi Live News

दीपक वाल्हे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर…

1 min read

 660 total views,  2 views today

दीपक वाल्हे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
अमळनेर प्रतिनिधी

 

डेबूजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष दीपक उखर्डू वाल्हे यांना जळगावातील राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे ‘समाजरत्न’ पुरस्कार 2020-21 जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा एस.डी.वाघ यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते व विलास पॉवर लाँड्रीचे संचालक दीपक वाल्हे हे लेक वाचवा, लेक शिकवा अभियानात जनजागृती करीत आहेत. त्यांनी लग्न सोहळा व इतर समारंभातील पारंपरिक गाण्यांचे संकलन करुन 1500 पुस्तके हौशी कलावंत, नागरिकांना मोफत वाटप केले. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक ग्रंथालय सुरु केले आहे. ते पर्यावरण रक्षणासाठी , उन्हाळ्यात पशु, पक्ष्यांना पाणी उपलब्ध करुन देत आहेत. पानखिडकी भागातील दुर्गा देवी ते गणपती मंदिर परिसरात कोणतीही धार्मिक मिरवणूक, शोत्रायात्रा, पालखी सोहळा असल्यास त्या रस्त्याने वाल्हे स्वखर्चाने आकर्षकरित्या रांगोळ्या काढतात. कोरोनाच्या कालावधीत लाँड्रा व्यावसायिक व इतर नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या गोळ्या, औषधी वाटप केली. तसेच ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असतात. अशा अनेक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच वितरण करण्यात येईल, असेही अध्यक्षा एस.डी.वाघ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright ©www.marathilivenews.in | LM +91 8698593194 | Newsphere by AF themes.